Monday, 18 February 2019

The Republic Day 2019

             We celebrated the republic day of India at our school. Flag hosting was done. We then went to the Gram panchayat Kolpe where we performed some activities regarding Beti Bachao Beti Padhao campaign. It was a proud moment for us to recieve positive comments from the spectators.  

Saturday, 11 August 2018

बांदावरची शाळा

                  भारत हा शेती प्रधान देश आहे. हजारो वर्षांपूर्वी पासून भारतीय लोक पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत.  प्रगतीच्या नावावर आपण क्षेपणास्त्र सुद्धा जगाला बनऊण दाखवले. जगात लोकसंखेत दुसय्रा क्रमांकावर असलेल्या भारता समोर अन्न ही समस्या भविष्यात कधी उदभऊ नये म्हणूनच भारताच्या भविष्याला शेतीची आेळख सुरूवाती पासूनच करून देण्याची गरज आहे. 
                जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आपल्या अधिनस्थ प्राथमिक शाळांमध्ये चालू वर्षापासून एक नाविण्यपूर्ण उपक्रम " बांदावरची शाळा " राबवत आहे. या उपक्रमांतर्गत परीसरातील शेतांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घ्यावा असा मानस आहे. दिनांक 6 व 7 जुलै 2018 ला सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी शेती व शेती साठी वापरली जाणारी औजारांची माहिती प्रत्यक्ष शेताच्या बांदावर जाऊन घेतली. 
             आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भात शेतीची माहिती घेतली व बळीराजा सोबत भात पिकाची लावणी करण्याचा आनंद घेतला. 
           शहरातील मोठमोठ्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी डिजिटलच्या माध्यमातून शेतीच्या आधुनिक पद्धतींचे धडे घेत असतील, परंतू ग्रामीण भागातील माझ्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी शेताच्या बांदावर जाऊन घेतलेल्या शेतीच्या अनुभवाचे आनंद त्यांना चोखता येणार नाही. खालील फोटो बघा आणि आपणच उत्तर द्या, बरोबर कि चूक? 

एक दिवस बळीराजासाठी



        जिल्हा परिषद सिंधुदुर्ग एक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत आहे" एक दिवस बळीराजासाठी "   
 




              शाळेतील विद्यार्थांना जेव्हां आम्ही शेताच्या बांधावरती घेऊन गेलो, खरच! खूप आनंद झाला.  माझी खूप वर्षांपूर्वीची इच्छा होती विद्यार्थ्यांसमवेत भात शेतीची माहीती घ्यावी. शाळेची वेळ आणि भाताची लावणी हे कधी जुळूनच आले नाही. या वर्षी मात्र, जशी कोणी जादूची छडी फिरवली माझे स्वप्न पूर्ण करण्या साठी.
            एक दिवस बळीराजासाठी किंवा बांधावरची शाळा हा उपक्रम विद्यार्थ्यांनां खूप आवडला. हा सुखद अनुभव त्यांना पारंपरिक शेतीकडे जाण्यास उपयोगी सिद्ध होईल.

Friday, 10 August 2018

अध्यापन: खरे सुख



           आजचा दिवस तसा बरा होता. संप झाल्या नंतरचा पहिला दिवस. शाळेतील बहुतेक मुलांना 3 दिवसाची सुट्टी आवडली नाही, ऐकून बरे वाटले. कांहींनी उदास होऊन सांगितले की घरी गमतच नाही. अध्यापन करताना खूप आनंद झाला. विद्यार्थ्यांनी ही आज रोजच्या पेक्षा जास्त प्रतिसाद दिला. कांही म्हणा, जो आनंद अध्यापनात आहे, तो जगाच्या पाठीवर कोठेच नाही.
          दुपार नंतर मोफत गणवेश योजना साठीच्या कामात व्यस्त झालो. अध्यापन थांबऊन लिखाण काम सुरू झाले.

Thursday, 9 August 2018

शेैक्षणिक घडामोडींसाठीचे बलाग

STRIKE: DAY 3

              Today on the third day of our strike we attended 
 SHAHEED MEJOR KAUSTUBH RAORANE SHRADHANJALI SABHA.  

Wednesday, 8 August 2018

STRIKE: DAY 2

     This is the second day of our strike. We have not joined our duties today. Our strike is continue. Let's see what happens the next. Stay with us. Support us.
      Thank you.