भारत हा शेती प्रधान देश आहे. हजारो वर्षांपूर्वी पासून भारतीय लोक पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. प्रगतीच्या नावावर आपण क्षेपणास्त्र सुद्धा जगाला बनऊण दाखवले. जगात लोकसंखेत दुसय्रा क्रमांकावर असलेल्या भारता समोर अन्न ही समस्या भविष्यात कधी उदभऊ नये म्हणूनच भारताच्या भविष्याला शेतीची आेळख सुरूवाती पासूनच करून देण्याची गरज आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आपल्या अधिनस्थ प्राथमिक शाळांमध्ये चालू वर्षापासून एक नाविण्यपूर्ण उपक्रम " बांदावरची शाळा " राबवत आहे. या उपक्रमांतर्गत परीसरातील शेतांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घ्यावा असा मानस आहे. दिनांक 6 व 7 जुलै 2018 ला सर्व प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी शेती व शेती साठी वापरली जाणारी औजारांची माहिती प्रत्यक्ष शेताच्या बांदावर जाऊन घेतली.
आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भात शेतीची माहिती घेतली व बळीराजा सोबत भात पिकाची लावणी करण्याचा आनंद घेतला.
शहरातील मोठमोठ्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी डिजिटलच्या माध्यमातून शेतीच्या आधुनिक पद्धतींचे धडे घेत असतील, परंतू ग्रामीण भागातील माझ्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी शेताच्या बांदावर जाऊन घेतलेल्या शेतीच्या अनुभवाचे आनंद त्यांना चोखता येणार नाही. खालील फोटो बघा आणि आपणच उत्तर द्या, बरोबर कि चूक?